Bookstruck

*राजधानीत 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘होय.’

‘आणखी कोणाची ?’

‘काय सांगू ? त्या पाहा तुमच्या मैत्रिणी आल्या.’

‘हे घ्या तुम्हाला फुल. कसले आहे ओळखा.’

‘माझ्या नावाचे.’

‘तुमचे नाव शिरीष वाटते ?’

‘विचारता कशाला ? तुम्हाला माहीतच आहे.’

‘कोण म्हणतो माहीत आहे ?’

‘मी म्हणतो. माझे नाव माहीत नसते, तर हे फूल तुम्ही आणलेच नसतेत आणि त्या दिवशी वसतीगृहात माझे नाव थोडेच लक्षात राहाते ?’

‘त्या पाहा मैत्रिणी आल्या. झाडाआड लपा. गंमत होईल. लपा.’

‘तुमच्याआ़ड लपते.’

‘मी जातो. तुम्ही येथे लपा.’

तो गेला. हेमा तेथे लपून राहिली. मैत्रिणी पाहात पाहात येत होत्या.

‘तुम्हाला इकडे मुख्य प्रधानाची मुलगी दिसली का ?’ एकीने विचारले.

« PreviousChapter ListNext »