Bookstruck

*राजधानीत 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

समारंभ संपला. उत्तीर्ण तरुण आनंदात होते. राजधानीतील सुखे भोगीत होते. इकडे तिकडे हिंडत होते, फिरत होते; परंतु शिरीष कोठे आहे ?

तो शीतला नदीच्या तीरी बसला होता.

तो पाहा हेमा आली.

‘तुम्ही पहिले आलेत, होय ना ?’

‘हो, आलो.’

‘तुम्हाला त्याचा आनंद नाही होत ?’

‘माझ्या आईबापांना खरा आनंद होईल.’

‘आणखी कोणाला होईल ?’

‘आणखी कोणाला होईल ?’

‘मला होईल. तुम्ही पहिले यावेत म्हणून मी जगदंबेची रोज पूजा करीत होते.’

‘तुमचा माझा काय संबंध?’

‘दुस-याचे कल्याण का इच्छू नये?’

‘परंतु मीच पहिले यावे म्हणून का तुमचा नवस? इतर कोणासाठी का केला नाहीत?’

‘मला नाही सांगता येत. मी जाते.’

« PreviousChapter ListNext »