Bookstruck

मी चोर नाही; तुम्ही चोर आहात 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रथ दृष्टीआड झाला. करुणेने एकदम काही तरी मनात ठरविले. ती त्या प्रासादाकडे वळली. पाय-या चढू लागाली.

‘कोठे जाता आत?’ पहारेक-याने हटकले.

‘मी भिकारीण आहे.’

‘भिकारीण राजवाड्यात शिरते? हो बाहेर.’

‘मी आत जाणार.’

‘हो बाहेर. दिसतेस बैरागीण; परंतु चोर तर नाहीस?’

‘चोर मी नाही. तुम्ही सारे चोर आहात, तुमचे मालक चोर आहेत, तुमचा धनी माझी वस्तू चोरुन घेऊन आला. ह्या भिकारणीची संपत्ती तुमच्या धन्याने चोरली.’

‘वेडी तर नाहीस?’

तेथे गर्दी जमली. स्त्रीवर हात कोण टाकणार? हेमा बाहेर आली.

‘काय पाहिजे बाई?’

‘माझी वस्तू.’

‘कोणती वस्तू.’

‘माझे चित्र द्या नाही तर माझे प्राण घ्या. चित्र, माझे चित्र. ते चोर आहेत. त्यांनी ते चोरून आणले.’

‘बाई, रागावू नका, आत या. मला सारे नीट समजून सांगा. या आत.’

हेमा त्या भिकारणीला, शिरीषच्या त्या करुणेला आत घेऊन गेली. पहारेकरी पाहातच राहिले!

« PreviousChapter ListNext »