Bookstruck

भेटी नंतर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

भेटी नंतर खालील गोष्टी नक्की करा

  1. तिच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मध्यस्त लोकांना तुम्ही तिला भेटला आहात हे फोन वगैरे करून कळवा. (त्यांना ठावूक आहेच पण अश्या प्रकारे फोने केल्याने तुमच्या बद्दल त्यांचे मत चांगले होयील)
  2. तिला SMS किंवा फेसबुक वर पुन्हा आभार माना. तिला सांगा कि ती पाहिजे तेव्हडा वेळ घेवू शकते.
  3. कुठल्याही प्रकारे नकार आला तर पुन्हा तिला मेसेज किंवा फोन करून उत्तरा बद्दल आभार माना आणि "बेस्ट ऑफ लक" द्या. तिने नकार दिला तरी तिच्या मित्र मैत्रीणीत किंवा कुटुंबात इतर मुली असतील ज्या तुमच्या विषयी तिला विचारू शकतात.
  4. एक गोष्ट नक्की ध्यानात ठेवा कि तुम्ही तिला जे काही सांगाल ते ती इतर लोकांना सागण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही उगाच काही तर बरळलात तर ह्या स्थळा शिवाय इतर स्थळा वर सुद्धा त्याचा प्रभाव पडू शकतो. विचारपूर्वक बोला.
  5. तिने काही खाजगी बाब सांगितली असेल तर ती इतर लोकांना अगदी आई वडिलांना सुद्धा सांगू नका.

तुमच्या लग्ना साठी आमच्या शुभेच्छा. तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला इमेल पाठवून सांगा आणि अपमचे लव गुरु तुमची हमखास मदत करतील. 

« PreviousChapter List