Bookstruck

राज आला, फुला वाचला 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘दहा रुपये देईन.’
‘निघून जा. काम होणार नाही.’

‘पन्नास देईन.’

‘छट्.’

‘शंभर घ्या.’

‘पाचशे देता?’

‘पाचशे?’

‘हो.’

‘तीनशे देतो! आता अधिक मागू नका.’

‘परंतु पैसे आत्ता मोजा.’

‘आत्ता?’

‘हो.’

‘मी रात्री आणून देतो.’

एक लाख रूपये पुढे मिळतील ह्या आनंदात गब्रु होता. त्याने शहरातील एका सधन आप्ताकडून कर्ज काढले. रक्कम घेऊन तो रात्री मांगाकडे गेला. मांगाने पैसे मोजून घेतले.

‘मात्र फसवू नका.’ गब्रु म्हणाला.
‘मांग फसवीत नसतो.’

‘सकाळी तेथे असेन.’

‘ठीक.’

‘गब्रु गेला. केव्हा उजाडते असे त्याला झाले. आज रात्र का मोठी झाली? आज सूर्य का कोठे पळाला? अजून कोंबडा का आरवत नाही? पाखरे का किलबिल करीत नाहीत? कधी संपणार रात्र? शेवटी एकदाचे उजाडले. आज उजाडताच फुलाला फाशी द्यावयाचे होते. लोकांच्या झुंडी बाहेर पडल्या. फाशी जाणार्‍याचे हाल पाहाण्यासाठी थवे जात होते. ‘देशद्रोह्याला शिक्षा, द्या फाशी,’ अशा गर्जना करीत लोक येत होते.

« PreviousChapter ListNext »