Bookstruck

सल्वाटर पेरन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



सल्वाटर पेरनच्या बऱ्याच शेजाऱ्यांसाठी तो एका मोडक्या घरात रहाणारा विचित्र  माणुस होता. १९८५ मध्ये पेरनने स्वतःसाठी आणि त्याच्या बायकोसाठी स्टेटन बेटावर एक तिनमजली घर घेतलं. पेरन महत्त्वाकांक्षी होता. त्याला स्वतःचा कापडव्यवसाय सुरू करायचा होता. कित्येक वर्षं तो घरोघरी जाऊन कपडे विकत होता पण वेळेबरोबर त्याचं काम आणि मनस्थिती दोन्ही बिघडू लागले.

 

पेरनने त्याच्या बायकोला कधी घटस्फोट दिला हे ज्ञात नाही पण २००१ पर्यंत त्याला दारू पिणे, पाठलाग करणे आणि चोरीसारख्या गुन्ह्यांसाठी अटक व्हायला लागली होती. त्याने खुप ध्येय ठरवली आणि एक काळ असा आला जेव्हा त्याच्या बॅंक खात्यात हजारो डॉलर जमा झाले. २००७ पर्यंत पेरनने त्याची कंपनी प्रसिद्ध केली पण तरीही त्याची ध्येय पुर्ण होऊ शकली नाहीत. आणि याचमुळे त्याचा स्वभाव बदलु लागला. एकेकाळी लाखात खेळणाऱ्या पेरनच्या खात्यात अटक झाली तेव्हा फक्त १.८४ डॉलर शिल्लक होते.  एका पाठोपाठ एक त्याने ३ दुकानदार मोहम्मद गेबेली, ईस्साक कदरे, आणि रह्मतोल्लाह वहिदीपौर यांचे काहीही कारण नसतना खून केले. पेरन जर दोषी सिद्ध झाला तर त्याचं संपूर्ण आयुष्य तुरूंगात जाईल.

 

« PreviousChapter ListNext »