Bookstruck

मुलीची आकस्मिक भेट 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘बाबांकडे.’

‘कोठे राहतात बाबा?’

‘लांब तिकडे.’

‘त्यांचे नाव काय?’

‘मी बाबा म्हणते. इतर लोक रामाबुवा म्हणतात.’

‘साधू आहेत वाटतं?’

‘म्हणजे काय?’

‘डोक्यावर जटा, गळ्यात माळा, अंगाला भस्म.’

‘अय्या, असे नाहीत काही बाबा. ते साधे माणसासारखे आहेत.’

‘तुला ते आवडतात?’

‘हो.’

‘तुला कोणत्या नावने हाक मारतात?’

‘बेबी सरोजा.’

‘कोणत्या?’

‘बेबी सरोजा.’
प्रेमाने तिला एकदम जवळ घेतले. तिचे मुके घेतले.

‘सापडली. सापडली माझी सरोजा.’

‘मी तुमची नाही. जाऊ दे मला.’

‘मी जाऊ देणार नाही. ये, तुझी वेणी घालते छान.’

तिने त्या सरोजाला धरले. सुवासिक तेल तिच्या केसांवर घातले. तिच्या दोन बाजूंच्या दोन सुंदर लांब वेण्या घातल्या. त्यांत फुले घातली. तिने त्या सरोजाचे तोंड नीट पुसले.

‘आता तुला कपडे हवेत?’

‘मला जाऊ दे.’

« PreviousChapter ListNext »