Bookstruck

माणूस मारला, माझा माणूस मारला...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

नाही हिंदू गं मारला,नाही मुस्लिम मारला
माणूस मारला, माझा माणूस मारला......

माझा हुसेन मारला, माझा किसन मारला
माणूस मारला, माझा माणूस मारला...।।

आमचं काळीज पारवा,जसा उबदार गारवा
आमच्या चाऱ्याच्या चोचीत बाँब भुकचा पेरला...।।

आले जुलुस झेंड्याचे,आले कळप गेंड्याचे
त्यांनी माणसातला माणूस ठेचून ठेचून मारला...।।

त्यांची हत्यारं रक्ताची,फौज बांधली भक्तांची
त्यांनी सिंहासनापुढं खर्या देवाला कापला...।।

त्यांच्या सभांना ही गर्दी, गोष्टी ऐके भूका दर्दी
केलं खर्याचं ग खोटं त्याचा मेंदू फिरवला...।।

धर्म ठेवा की घरात, का ही काढली वरात
खरा धरम घामाचा, त्याचा इतिहास जागवा
माणूस जागवा,माझा माणूस जागवा...।।

- शाहीर संभाजी भगत.

« PreviousChapter List