Bookstruck

कुषाण साम्राज्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मोर्य साम्राज्याच्या विभाजनानंतर इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात दक्षिण आशियात प्रादेशिक ताकदींच्या आच्छादनाचा अंतर्भाव झाला. भारताच्या असुरक्षित असलेल्या उत्तरपश्चिमी सीमांनी इ.स.पूर्व २०० ते इ.स. ३०० मध्ये अनेक आक्रमणकर्त्यांना आकर्षित केलं. हे आक्रमणकर्ते विजय आणि विल्हेवाट या बाबतीत भारतीय बनले. उत्तरपश्चिमच्या इंडो ग्रीक ने मुद्राशास्त्राच्या विकासात योगदान दिलं, त्यानंतर मध्य आशियात आलेले शकास गट भारतातच निवास करू लागले. इतर भटकणाऱ्या प्रजाती, युएज्हींनी उत्तरपश्चिम भारतातून शकासांना बाहेर हाकलवून लावलं आणि कुषाण साम्राज्याची स्थापना केली. कुषाण साम्राज्याने अफगाणिस्तान आणि ईराणच्या भागांनाही आपल्या नियंत्रणात घेतलं. भारतात त्यांचं साम्राज्य उत्तर पश्चिमेच पुरूशापुरा (आधुनिक पेशावर) पासुन सुरू होऊन पूर्वेला वाराणसी व दक्षिणेत साँची पर्यंत पसरलं होतं. काही काळासाठी त्यांचं राज्य पुर्वेला पाटलीपुत्र पर्यंतही पोहोचलं होतं. कुषाण साम्राज्य भारतीय, चिनी, पर्शियन व रोमन साम्राज्यांमध्ये व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं. कनिष्का ,ज्याने इ.स. ७८ च्या दोन दशक आसपास राज्य केलं, हा सर्वात प्रभावी कुषाम राजा ठरला. त्यानेही बौद्ध धर्माचा स्विकार केला आमि काश्मिरमध्ये एका मोठ्या बौद्ध समितीची स्थापना केली. कुषाण गंधारण कलेचे उपासक होते जो ग्रीक आणि भारतीय शैली आणि संस्कृत साहित्याचा मिलाप होता. त्यांनी इ.स. ७८ मध्ये शाक कलेची सुरूवात केली जिचा २२ मार्च १९५७ मध्ये भारतात नागरिक उद्दिष्टांसाठी उपयोग होऊ लागला आणि आजही होतो आहे.
« PreviousChapter ListNext »