Bookstruck

संभाजी भोसले

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

संभाजी भोसले छत्रपति शिवाजी यांचा सर्वात मोठा मुलगा होता. संभाजी ने शिवाजींनतर सत्तेची सुत्रे हातात घेतली. त्याच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य व मुघल सत्तेत युद्ध होत राहिली. संभाजीचं लग्न राजकीय तहा अंतगर्त जिऊबाईंबरोबर झालं. या लग्नामुळे संभाजींना कोंकणाच्या किनारी भागात प्रवेश मिळाला. १६८७ मध्ये झालेल्या युद्धानंतर मराठा सैन्याला मुघल सैन्याकडून प्रचंड नुकसान झालं.

त्यांचे सेनापती हमिबराव मोहिते यांचा मृत्यू झाला आणि सैनिक मराठा सैन्याची साथ सोडू लागले. संभाजीच्या स्थानांवर शिर्के गट (मुघलांचे मित्रगट) च्या सैन्याची नजर पडलीसंभाजी आणि त्याच्या २५ सल्लागारांना मुर्कराब खानच्या मुघल सैनिकांनी फेब्रुवारी १६८९ मध्ये एका चकामकीनंतर कैदी करून घेतलंकैदी असलेल्या संभाजी व कवी कलश यांना बहादुरगडला नेण्यात आलं जिथे औरंगजेबाने त्यांना अडाण्यासारखे कपडे घालून त्यांचा अपमान केला. मुघल सुत्रांच्यामते संभाजीला जेव्हा त्यांचे किल्ले, संपत्ती आणि सगळंच त्याग करण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्याने बादशाह आणि एस्लाम धर्माचा अपमान करून आपले भोग निश्चीत केले आणि त्यांना मुसलमानांना मारण्यासाठी मृत्यूदंड देण्यात आला. संभाजीवर अनेक अत्याचार करून ११ मार्च १६८९ ला भीमी नदीजवळ त्यांचं शीर धडापासून वेगळं करण्यात येऊन त्यांना मारण्यात आलं.

 

« PreviousChapter ListNext »