Bookstruck

स्त्रियांना शरीर सम्बधातून जास्त सुख मिळते

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्त्रिया उत्तेजित  लवकर होत नाहीत पण स्त्री उत्तेजित झाली तर पुरुषापेक्षा अनेक पतीने जास्त सुखाचा अनुभव करू शकते. गर्भधारणा आणि उत्तेजना ह्यांचा गाढ संबंध असतो. जी स्त्री अधिक उत्तेजित होते ती गर्भ धारण करण्याची जास्त शक्यता आहे. स्त्रियांना दर महिन्याला मासिक पाळी सारख्या कठीण परीस्थ्तीत्ला सामोरे जावे लागते म्हणून कदाचित निसर्गाने हे गिफ्ट स्त्रियांना दिले आहे.

स्त्री उत्तेजित झाली म्हणजे तिच्या शरीरातील अनेक हार्मोन अधिक प्रमाणात निर्माण होतात ह्या मुले पुरुषाचे बीज रोपण होण्यास आणि गर्भ धारणा होण्यास मदत होते.

लैंगिक संबंध दोघांनी,एकत्र करायची बाब आहे. पुरुषांमध्ये लैंगिक सुख आणि वीर्य बाहेर येण्याची क्रिया एकत्र घडते. मात्र स्त्रियांमध्ये लैंगिक संबंध आले तरी लैंगिक सुख मिळेलच असं सांगता येत नाही. त्यासाठी स्त्रीच्या शरीराची माहिती घ्यायला पाहिजे. तसंच स्त्रियांच्या लैंगिक इच्छा आणि पूर्तीविषयी देखील माहिती करून घ्यायला पाहिजे. 


स्त्रियांमधील ऑरगॅझम (लैंगिक पूर्ती)


स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकीला कशाने चांगला वाटेल, कशाने उत्तेजना निर्माण होईल हे सांगता येणं अवघड आहे. तरीही तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला संवाद असेल तर तिला कशाने चांगलं वाटतं हे तुम्हाला एकमेकांशी बोलून कळू शकेल. त्यासाठी संवाद वाढवणं, घाई न करणं आणि एकमेकांना आवडेल अशा गोष्टी करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. 


अजून एक गोष्ट लक्षात घ्या. लैंगिक उत्तेजना केवळ लैंगिक संबंधांच्या वेळीच निर्माण होते असं नाही. एरवी दिवसभरात तुम्ही काय काय गोष्टी एकत्र करता, एकमेकांचा सहवास तुम्हाला मिळतो का, तुम्ही इतर काय काय शेअर करता त्या सगळ्याचा परिणाम लैंगिक इच्छेवर आणि लैंगिक उत्तेजनेवर होत असतो. त्यामुळे एरवीही एकमेकांना आनंद वाटेल अशा गोष्टी करत रहा.

« PreviousChapter ListNext »