Bookstruck

मूळ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुनर्जन्माच्या या संकल्पनेच्या उगमाच मूळ अजूनही अस्पष्ट आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत (सिंधू घाटी) या विषयावरील संभाषण आढळते. सॉक्रेटीसच्या काळापासून पूर्व ग्रीक सुद्धा पुनर्जन्माच्या मुद्द्यावर चर्चा करीत असत आणि आपल्या काळात सेल्टीक ड्रुयुड देखील पुनर्जन्मावर धडे शिकवायचे. पुनर्जन्माशी संलग्न विचार अनेक क्षेत्रांत स्वतंत्रपणे उदयाला आले असावेत किंवा सांस्कृतिक संपर्काच्या माध्यमातून जगभरात पसरले असावेत. सांस्कृतिक संपर्काला पाठींबा देणारे सेल्टीक, ग्रीक आणि वैदिक विचारसरणी आणि धर्म यांचे संबंध शोधत आहेत, काहींच तर म्हणणं आहे की प्रोटो - इंडो - युरोपियन धर्माचाही पुनर्जन्मावर विश्वास होता.

 

१९ ते २० वे शतक

१९व्या शतकापर्यंत तत्वज्ञ स्चोपेनहौएर आणि नित्ज्स्चे पुनर्जन्माच्या धारणेवर वादविवाद करण्यासाठी भारतीय ग्रंथांचा उपयोग करू शकत होते. अंतर्मनाचे दर्शन, तुलनात्मक धर्म, धार्मिक अनुभवांचं मनोविज्ञान आणि अनुभववादाच्या प्रकृतीच्या विचारांना सर्वांसमोर सादर करणाऱ्या विलियम जेम्स च्या विशेष प्रभावामुळे २० व्या शतकाच्या प्रारंभी पुनर्जन्मातील स्वारस्य हा मनोविज्ञानाच्या प्राथमिक शिक्षणाचा भाग होता. या काळात पुनर्जन्माच्या कल्पनेच्या लोकप्रियतेला थीयोसोफिकल समाजाच्या व्यवस्थित आणि सुलभ भारतीय संकल्पनेच्या शिक्षणाने आणि गोल्डन डॉन सारख्या समितीमुळे प्रोत्साहन मिळालं. एनी बेझंट, डब्ल्यू. बी. यीट्स आणि डीओ फोर्चून सारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी यक विषयाला पौर्वात्य संस्कृतीपेक्षा पाश्चिमात्य संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनवलं. सन १९२४ पर्यंत हा विषय मुलांच्या पुस्तकातील एक चेष्टेचा विषय बनला होता.

 

« PreviousChapter ListNext »