Bookstruck

राजनीति : १९८४-१९८७

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१९८४मध्ये अमिताभ यांनी चित्रपटातून विश्रांती घेऊन त्यांचे जुने मित्र राजीव गांधी यांच्या सहकार्याने राजनीतिमध्ये प्रवेश केला. त्यांनी अलाहाबाद मध्ये लोकसभेत सीट मिळवुन उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एच. एन. बहुगुणा यांना (६८.२%) मतांनी हरवलं होतं. त्याचं राजनैतिक कार्यभाग काही काळापर्यंत होता. याच कारण त्यांच्या भावाच नावं बोफोर्स विवादात अडकल होतं, ज्यामुळे त्यांना कोर्टात जाव लागलं. तिथून त्यांची निर्दोष सुटका झाली.  ज्यावेळी बच्चनयांची एबीसीएल कंपनी आर्थिक संकटात होती त्यावेळी त्यांचे जुने मित्र अमरसिंह ह्यांनी त्यांची मदत केली. त्यानंतर बच्चन यांनी अमरसिह यांच्या राजनीतिक आणि समाजवादी पार्टीला सहयोग देण्यास सुरवात केली.          
जया बच्चन या समाजवादी पार्टीत सहभागी होऊन राष्ट्रवादीच्या सदस्या बनल्या. बच्चन यांनी समाजवादी पार्टीला समर्थन देण्यास सुरवात केली. ज्यात राजनीतिक प्रचार प्रसार ह्या गोष्टींचा सहभाग होता. त्यांच्या या गोष्टीनमुळे ते पुन्हा एकदा अडचणीत आले. ते एक शेतकरी आहेत या संबंधीचे कागदपत्र त्यांना कोर्टात जमा करण्यासाठी जावे लागले. स्वयंभू प्रेस ने अमिताभ यांच्यावर बंदी आणली होती हे खूप कमी लोकांना माहित आहे. स्टारडस्ट आणि इतर पत्रीकानी मिळून एकसंघ होऊन बच्चन यांच्यावर १५ वर्षांसाठी बंदी आणली होती. त्यांनी आपल्या प्रकाशनामध्ये बच्चन यांच्या विषयी काहीही न छापण्याचा निर्णय घेतला होता. १९८९ च्या शेवट पर्यंत बच्चन यांच्या सेटवर जाण्यास प्रेसला बंदी आणली होती. असं म्हणतात कि बच्चनयांनी काही प्रेसना त्यांनी स्वताःहा बंदी घातली होती. कारण ह्या प्रेस त्यांच्या बाबतीत जे उलट सुलट लिहायचे ते त्यांना आवडत नव्हत आणि  त्यांच्या या गोष्टीच पालन न केल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा आपल्या विशेषअधिकारांचा उपयोग करावा लागायचा.
« PreviousChapter ListNext »