Bookstruck

एकदंत

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


महर्षी च्यवन यांनी आपल्या तपस्येने मदाची रचना केली. तो च्यवनचा पुत्र मानला गेला. मदाने दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली. शुक्राचार्यांनी त्याला सर्व प्रकारच्या विद्येत निपुण बनवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने देवांना विरोध करण्यास सुरुवात केली. सारे देव त्याच्यामुळे त्रस्त राहू लागले. मद एवढा शक्तिशाली झाला होता की त्याने भगवान शंकरांचा देखील पराभव केला. सर्व देवतांनी मिळून गणपतीची आराधना केली. तेव्हा भगवान गणेशानी एकदंताचे रूप घेऊन प्रकट झाले. त्यांचे चार हात होते, एक दात होता, पोट मोठं होतं आणि शीर हत्तीसारखे होते. त्यांच्या हातात पाश, परशू आणि एका हातात उमललेले कमळ होते. एकदंताने देवताना अभय दिले आणि मदासुर चा युद्धात पराभव केला.

« PreviousChapter ListNext »