Bookstruck

आपण सारे भाऊ 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘ती पोळी, मुरांबा का म्हशीला घालू?’  रमाने विचारले.

‘म्हशीला कशाला? मी खाईन. तू सुध्दा बाटशील वाटते ती खाऊन? बरीच की ग आहेस! तरी बरे, की नवरा मिळवता नाही, रोजगारावर नाही. तसे असते तर नाकाने कांदे सोलले असतेस.’

‘आई नाकाने ग कसे कांदे सोलतात?’

‘तुझी वैनी दाखवील!’

‘तू दाखव.’

‘आधी पोळी खा. भूक ना लागली आहे?’

‘मला पाणी दे.’

‘त्याला पाणी दे ग.’

‘वैनी नको, तू दे.’

‘अरे, उद्या तिच्याजवळच दिवस काढायचे आहेत तुला.’

‘उद्या तू कुठे जाणार आहेस?’

‘उद्या नाही; पण लवकरच जावे लागेल.’

‘मी येईन तुझ्याबरोबर, मला येथे नको ठेवू. तू रात्री जाणार असशील तर मी जागा राहीन. आई नेशील
मला?’

‘तू आता खेळायला जा.’

« PreviousChapter ListNext »