Bookstruck

दुर्दैवी 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तिला काय विचारायचे? काठी मारून घेऊन जा. माझ्या पाठोपाठ येऊ लागली, तर काठी मारीन.''

''खरेच का तुम्ही माझा विक्रा मांडला आहे?''

''होय, होय, होय. पुन्हा विचारलेस तर थोबाड रंगवीन.''

''ठरला सौदा.'' लोक म्हणाले.

''परंतु पैसे कोठे मोजले आहेत याने?'' तो तरुण नवरा म्हणाला.

''माझ्या मुलीसह मला घेत असाल तर मी येते. यांना जर माझी किंमत नसेल, तर कशाला त्यांच्याबरोबर राहू? घेता माझी मुलगीही?''

''ठीक. मुलीसकट सौदा ठरवू. पाच रुपये जास्त द्या. न्या एकदा ब्याद.'' तो नवरा म्हणाला.

तेथे टेबलावर पैसे मोजण्यात आले. विकत घेणारा म्हणाला, ''पैसे दिले; आता ही माझी बायको झाली; सारे साक्षी आहात. घे तुझी मुलगी. चल माझ्याबरोबर.''

तिने क्षणभर आपल्या पतीकडे पाहिले.

''बघतेस काय? हो चालती. आज तुला गिर्‍हाईक मिळाले. मला दोन दिडक्या झाल्या. नवीन उद्योग करायला भांडवल झाले.''

तिने मुलीला उचलून घेतले. सौदा करणार्‍याच्या पाठोपाठ ती निघाली. ती गेली. तो दारू प्यालेला नवरा तेथे बाजूला झिंगून पडला.

''आजपर्यंत असे आपण पाहिले नाही.'' एक म्हणाला.

''आणि तीही निघून गेली!'' दुसरा म्हणाला.

''किती दिवस ती याचा त्रास सहन करणार? हा रोज तिला बोलत असेल, छळीत असेल.'' तिसरा म्हणाला.

« PreviousChapter ListNext »