Bookstruck

दुर्दैवी 27

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तेथे काबुली द्राक्षे होती. गोड साखरी द्राक्षे. त्याने तिला दिली.

''खा बेटा. तू मला परकी नाहीस. मी चिठी देतो ती तुझ्या आईला नेऊन दे.''
त्याने चिठी लिहिली.

''तुला वाचता येते का?''

''हो.''

''कोणी शिकविले!''

''बाबांनी. आईलाही त्यांनीच शिकविले.''

''तुझे बाबा काय करीत?''

''गलबतावर असत. खलाशी होते. परंतु त्यांना सारे येत असे. ते म्हणत, कोणताही धंदा असला तरी ह्या काळात लिहिण्या-वाचण्याशिवाय गत्यंतर नाही.''

''तुझे वडील अकस्मात् वादळात बुडाले?''

''हो. त्यांचा पत्ता पुढे लागला नाही.''

''वाईट झाले.''

''तुम्ही आता आम्हांला आधार देणार ना? तुम्ही का आमचे दूरचे नातलग आहांत?''

''आहे दूरची ओळख.''

« PreviousChapter ListNext »