Bookstruck

दुर्दैवी 56

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तुम्हाला सारे समजते?''

''हो.''

''हे बघा, या हेमंताला सारंगगावातून हाकलून लावण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. आपण येत्या हंगामात सारे धान्य खरेदी करू. हेमंताला एक गाडी मिळू द्यायची नाही. परंतु पुढे भाव वाढतील का घटतील?''

''हे मी ज्योतिष पाहून सांगेन. तुम्ही निश्चिंत राहा. या हेमंताचा काटा आपण काढून टाकू!''

''येत्या महिन्यापासून तुम्ही माझे मुख्य मुनीम व्हा. सारा कारभार बघत जा. तुमच्यावर मी विश्वास ठेवतो.''

''आपला मी आभारी आहे. तुम्हांला मी दुरून पूर्वीपासून ओळखतो.''

''मला?''

''तुम्ही पूर्वी गरीब होता. त्या नारिंगी गावात राहात होता. तुम्ही त्या गावात आजारी पडलेत. आठवते?''

''तुम्ही ना नारिंगी गावचे?''

''तेथे असाच होतो. ऋणानुबंधाच्या गोष्टी, म्हणून आज तुमच्याकडे मी नोकर होत आहे. तुम्ही असे लक्षाधीश व्यापारी व्हाल असे तेव्हा तुम्हांलाही वाटले नसेल. परंतु एकेकाचे दैव असते.''

''आणि उद्योग, धडपड यांना नाही का श्रेय?''

''तरी दैवाची जोड लागते, रंगराव.''

''मी तर दुर्दैवी आहे.''

''असे नका म्हणू. तो हेमंत गेला म्हणजे व्हाल ना सुखी?''

''तो हेमंत एकदा दवडा येथून.''

« PreviousChapter ListNext »