Bookstruck

दुर्दैवी 64

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ज्यात तुला आनंद वाटेल ते कर.''

''परंतु तुमचा आनंद कशात आहे? जाऊ का दुसरीकडे राहायला?''

''जा; मी तुला स्वातंत्र्य दिले आहे आणि त्या हेमंताशी बोलत जा. त्याला भेटत जा. तुला बंदी केली होती. परंतु बंदीहुकूम आज मागे घेतो. तुला मी मोकळीक देतो.''

''तुम्ही सरळपणाने सांगता की उपरोधाने?''

''तू वाटेल तो अर्थ कर. आज तरी येथे जेवणार ना?''

''मी काही आज नाही जायला निघाले. मनात आले ते तुम्हांला विचारले.''

ती दोघे जेवायला गेली. हेमा पटकन जेवून आपल्या खोलीत गेली. कोणते तरी पुस्तक घेऊन ती वाचीत बसली. रंगराव आपल्या खोलीत जाऊन पडले. रात्र बरीच झाली तरी हेमा जागीच होती. ती बांधाबांध करीत होती? सामान जुळवून ठेवीत होती? ती खरोखरीच उजाडत जाणार होती?

सकाळ झाली. आठ वाजता हेमा बाहेर पडली. ती बाजारातून जात होती. रस्त्याला टोकाला आली. तिने वर पाहीले. वरून टाळी वाजविली. ती बाई तेथे उभी होती. हेमा वर गेली. तेथे दोन खोल्या होत्या. एकीत स्वयंपाकाची जागा होती.

''ही बसायची खोली. ये हेमा. बस. या खाटेवर बस. परकेपणानं नाही हां वागायचे.''

''तुमचे नाव काय?''

''माझे नाव सुलभा. मी काही या गावची नाही. मी दूरची आहे. जरा हवापालट करायला म्हणून इकडे आले आहे.''

''तुमचे गाव कोणते?''

''नारिंगी.''

« PreviousChapter ListNext »