Bookstruck

ए पी जे अब्दुल कलाम

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



डॉ. ए पी जे अब्दुल कलाम सन २००२ ते २००७ पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. कलाम यांचा जन्म तामिळनाडू मधल्या रामेश्वरम इथे झाला होता आणि त्यांनी भौतिक शास्त्र आणि एयरोस्पेस मध्ये इंजीनियरिंग पूर्ण केले. पुढची ४ दशके ते डी.आर.डी.ओ. आणि इस्रो साठी वैज्ञानिक म्हणून काम करत होते. त्यांना भारताचा "मिसाईल मेन" म्हटले जाते.
राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर कलाम आय.आय.एम. शिलॉंग, अहमदाबाद आणि इंदोर इथे पाहुणा शिक्षक म्हणून काम करत. याव्यतिरिक्त त्यांनी अन्य संस्थानांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. ते हैदराबाद इंटरनेशनल इंस्टिट्यूट ऑफ़ इनफार्मेशन टेक्नोलॉजी मध्ये आणि बनारस हिन्दू विश्वविद्यालय व अन्ना विश्वविद्यालय इथे तंत्रज्ञान शिकवत असत.

« PreviousChapter ListNext »