Bookstruck

द्रोणाचार्य यांच्या जन्माची कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांचे गुरु होते. द्रोणाचार्यांचा जन्म कसा झाला याचे वर्णन महाभारताच्या आदि पर्वात मिळते - एके काळी गंगा द्वार नावाच्या स्थानावर महर्षी भारद्वाज वास्तव्य करत असत. ते मोठे व्रतशील आणि यशस्वी होते. एकदा ते महर्षींना सोबत घेऊन गंगा स्नान करायला गेले. तिथे त्यांनी पहिले की घृताचि नावाची अप्सरा नुकतेच स्नान करून पाण्यातून बाहेर निघाली आहे. तिला पाहून त्यांच्या मनात कामवासना जागृत झाली आणि त्यांचे वीर्यस्खलन होऊ लागले. तेव्हा त्यांनी त्या विर्याला द्रोण नावाच्या एका यज्ञ पात्रात (यज्ञासाठी वापरण्यात येणारे एक प्रकारचे भांडे) ठेवले. त्यातूनच द्रोणाचार्यांचा जन्म झाला. द्रोणाचार्यांनी सर्व वेदांचे अध्ययन केले. महर्षी भारद्वाजांनी आधीच अग्निअस्त्राचे शिक्षण अग्निवेष्य याला दिलेले होते. आपले गुरु भारद्वाज यांच्या आज्ञेवरून अग्निवेष्यने द्रोणाचार्यांना अग्निअस्त्राचे शिक्षण दिले. द्रोणाचार्यांचा विवाह शरद्वान ची कन्या कृपी हिच्यासोबत झाला होता.

« PreviousChapter ListNext »