Bookstruck

मनु व शतरूपा यांच्या जन्माची कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


धर्म ग्रंथांनुसार मनु आणि शतरूपा विश्वातील प्रथम मानव मानले जातात. त्यांच्यापासूनच मानव जातीचा आरंभ झाला. मनुचा जन्म भगवान ब्रम्हदेवाच्या मनातून झाला असे मानले जाते. ऋग्वेद कालपासूनच मनूचा उल्लेख मानवी सृष्टीचा आदि प्रवर्तक आणि समस्त मानव प्रजातीचा आदि पिता या स्वरुपात केला जातो. त्याला "आदि पुरुष" असेही म्हटले जाते. वैदिक संहितांमधेही मनुला ऐतिहासिक व्यक्ती मानले गेले आहे. तो सर्वप्रथम मानव होता आणि त्याला मानव जातीचा पिता तथा सर्व क्षेत्रात मानव जातीचा मार्गदर्शक या रुपात स्वीकारण्यात आलेले आहे. मनूचा विवाह ब्राम्ह्देवाच्या उजव्या भागातून उत्पन्न झालेल्या शतरूपा हिच्याशी झाला होता. मनु एक धर्मशास्त्रकार देखील होता. धर्मग्रंथांनंतर धर्माचरणाचे शिक्षण देण्यासाठी आदि पुरुष स्वयंभू मनुने स्मृतीची रचना केली जी मनुस्मृती या नावाने प्रसिद्ध आहे. उत्तानपाद, ज्याच्या घरात ध्रुव बाळ जन्माला आला होता, मनुचाच पुत्र होता. मनु स्वयंभू चा ज्येष्ठ पुत्र प्रियव्रत पृथ्वीवरील प्रथम क्षत्रिय मानला जातो. यांच्या द्वारे प्रणीत असलेल्या "स्वायंभुव शास्त्रा" नुसार पित्याच्या संपत्तीमध्ये पुत्र आणि कन्या यांचा समान अधिकार आहे. त्याला धर्मशास्त्राचे आणि प्राचेतस माणू अर्थशास्त्राचे आचार्य समजले जाते. मनुस्मृतीने सनातन धर्माला आचार संहितेशी जोडले होते.

« PreviousChapter ListNext »