Bookstruck

वाली कडून रावणाचा पराभव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

एकदा रावण वालिशी युद्ध करण्यासाठी गेला. वाली त्यावेळी पूजा करत होता. रावण पुन्हा पुन्हा वालीला डिवचत होता, ज्यामुळे वालीच्या पूजा साधनेत व्यत्यय येत होता. जेव्हा रावण अजिबात ऐकेना, तेव्हा वालीने त्याला आपल्या काखेत दाबून धरले आणि ४ महासागरांवरून प्रदक्षिणा घालून आणले होते. वाली हा महाशक्तिशाली होता, आणि एवढ्या तीव्र वेगाने चालत असे की रोज सकाळी सकाळी तो ४ महासागर फिरून येत असे. अशा प्रकारे प्रदक्षिणा घालून झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असे. आपली ही रोजची प्रदक्षिणा आणि सूर्याला अर्घ्य देऊन होईपर्यंत वालीने रावणाला आपल्या काखेत दाबून धरले होते. रावणाने खूप प्रयत्न केले, परंतु तो वालीच्या पकडीतून सुटू शकला नाही. पूजा पूर्ण झाल्यानंतर वालीने रावणाला मुक्त केले.

« PreviousChapter ListNext »