Bookstruck

वंदना शिव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


वंदना शिव भौतिक वैज्ञानिक, तत्वज्ञानी, पर्यावरण कार्यकर्ती, विकास सल्लागार, स्त्रीवादी, लेखक आणि खूप काही आहेत. जागतिकीकरणावर स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय फोरम च्या त्या महत्त्वपूर्ण सदस्या आहेत. त्यांनी अनेक पारंपारिक धोरणांच्या विरोधात आवाज उठवला आहे, जे त्यांच्या भारतीय वैदिक संस्कृती वर आधारित पुस्तक वेदिक इकोलॉजी मध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी मोंसंतो सारख्या मोठ्या कंपनीच्या विरोधात भारतीय वंशाचे बीज जसे कडूनिंब, बासमती आणि गहू यांच्या दुरुपयोगाविरुद्ध केस लढल्या आणि जिंकल्या देखील. टाईम्स पत्रकाने २००३ मध्ये त्यांना पर्यावरण हिरो म्हणून घोषित केले आणि एशिया वीक ने त्यांना आशियातील सर्वात प्रभावी संचारक म्हटले आहे.

« PreviousChapter ListNext »