Bookstruck

एड्स ची लक्षणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


बहुतेक वेळा एच. आय. व्ही. चा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये दीर्घ काळापर्यंत कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. तसेच दीर्घ काळापर्यंत (३ ते ६ महिने) एच. आय. व्ही. चे विषाणू देखील वैद्यकीय चाचणीत दिसून येत नाहीत. बहुतांश वेळा एड्स च्या रुग्णांना सर्दी किंवा व्हायरल ताप येतो, परंतु त्यामुळे एड्स झाल्याचे ओळखता येत नाही. एड्स ची काही प्राथमिक लक्षणे आहेत -
    ताप
    डोकेदुखी
    थकवा
    कॉलरा
    मळमळ होणे आणि जेवणावरची वासना उडणे
    नसांमध्ये सूज
लक्षात ठेवा, हीच सर्व लक्षणे साधा ताप किंवा इतर कोणत्या सामान्य आजाराचीही असू शकतात. त्यामुळे एड्स चे निशित स्वरुपातील परीक्षण केवळ आणि केवळ वैद्यकीय चाचाणीतूनच होऊ शकते, आणि केले गेले पाहिजे.

प्रथमिक अवस्थेत एड्स ची लक्षणे
    भराभर मोठ्या प्रमाणावर वजन घटणे
    सुका खोकला
    सतत ताप येणे किंवा रात्रीच्या वेळी मोठ्या / असाधारण प्रमाणात घाम येणे
    जांघ, काख किंवा मानेत बराच काळ सूजलेल्या नसा
    एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अतिसार होणे, किंवा दीर्घ कालावधीसाठी गंभीर स्वरूपाचा कॉलरा
    फुफ्फुसांची जळजळ
    त्वचेच्या खाली, तोंड, पापण्यांच्या खाली, किंवा नाकामध्ये लालसर, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे डाग
    निरंतर विसराळूपणा




« PreviousChapter ListNext »