Bookstruck

भगवान शिव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


भगवान शिव आदि आहेत आणि अनंत आहेत, याचाच अर्थ असा की कोणालाही त्यांच्या उत्पत्तीबद्दल माहिती नाही तसेच कोणीही त्यांच्या अंताबाबत काहीही जाणत नाही. म्हणजेच शंकरच परमपिता परमेश्वर आहे. भगवान शंकराने देखील गुरु बनून आपल्या शिष्यांना परम ज्ञान प्रदान केलेले आहे. म्हणूनच जर भगवान शंकराला सृष्टीचे प्रथम गुरु म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान परशुरामांना अस्त्र शिक्षण शंकरानेच दिले होते. त्यांनी दिलेल्या परशूच्या सहाय्यानेच भगवान परशुरामांनी तब्बल २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. ब्रम्हवैवर्त पुराणानुसार नागांची बहिण जगत्कारू (मनसा) हिचे गुरु देखील भगवान शंकरच होते.

« PreviousChapter ListNext »