Bookstruck

राज कुमारी गुप्ता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


एक अशी स्त्री जी अज्ञात सैनिक या खिताबाला पूर्णपणे योग्य आहे ती म्हणजे राज कुमारी गुप्ता. कानपूरच्या बांदा इथे जन्मलेल्या राज कुमारी ने आपल्या पतीसोबत महात्मा गांधी आणि चंद्रशेखर आझाद दोघांसोबत देखील कार्य केले आहे. काकोरी कांडात त्यांना सैनिकांपर्यंत बंदुका पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. म्हणून तिने बंदुका आपल्या आंतर्वस्त्रात लपवल्या आणि आपल्या ३ वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन या कामासाठी निघाली. शेवटी पोलिसांनी तिला अटक केली आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला बेदखल केले.

« PreviousChapter ListNext »