Bookstruck

कर्ण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


कर्ण मागच्या जन्मात तानासूर (सहस्त्रकवच) नावाचा एक इक्षास होता ज्याला हजार मस्तके होती. त्याच्या शरीराला हजारो कवचे सुरक्षित ठेवत होती. त्याला मारणे सोपे नव्हते. कोणत्याही व्यक्तीला १ वर्ष तप करावे लागत असे आणि त्यानंतर १ वर्ष युद्ध करून त्याचे मस्तक कापता येत होते. जेव्हा लोक या राक्षसाच्या त्रासाने हैराण राहू लागले तेव्हा विष्णू भागावानानंनी त्याला मारण्याचा निश्चय केला. विष्णूने नर नारायणाचा अवतार घेतला. जेव्हा नर तानासुराशी लढत होता तेव्हा नारायण १ वर्ष तप करत होता. जेव्हा नराने त्याची ९९९ मस्तके कापली तेव्हा राक्षस सूर्यलोकात जाऊन लपून बसला. कर्णाने तानासुराच्या पुनर्जन्माच्या रूपाने जन्म घेतला आणि तानासुराजवळ शिल्लक असलेले शेवटचे कवच आणि कुंडल या जन्मात देखील कार्णासोबत होते.

« PreviousChapter ListNext »