Bookstruck

लिलीची भेट 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इतक्यात मालक वर आला. त्याने लिलीची तयारी पाहिली.

'हे घ्या बिल.' तो म्हणाला.

'साडेपाचशे रुपये?'

'हो, थोडे कमी करून सांगितले.'

'बरं, देतो हं पाठवून.'

मालक खाली गेला. पाहुण्याने आपल्या खिशातून   कोर्‍याकोर्‍या नोटा साडेपाचशेच्या काढल्या. नंतर त्याने आपली काठी व गाठोडे घेतले.

'लिल्ये, चल. ते बूट घाल ना.'

'ते का माझ्यासाठी?'


'हो, वेडीच आहेस.'

लिलीने बूट घातले. पाहुण्याबरोबर ती निघाली. दोघे खाली आली. खाणावळवाल्याजवळ पाहुण्याने त्या नोटा दिल्या. नमस्कार करून तो निघाला. त्याचा हात धरून लिली निघाली.

गावातील लोक बघू लागले. लिली नाचत-गात चालली होती. तिचे कशाकडेही लक्ष नव्हते. गाव संपला. बाहेरचा रस्ता आला.
'लिल्ये, तुला मी खांद्यावर घेतो. म्हणजे आपण लवकर घरी जाऊ.'

'घ्या मला खांद्यावर.' ती हसून म्हणाली.

'नीट बसशील ना?'

'हो. झाडावर चिमणी बसते तशी मी बसेन.'

आजोबांनी लिलीला फुलाप्रमाणे उचलले. ती हसली. तोही हसला. झपाटयाने वाघासारखा तो चालू लागला. आता रानातून रस्ता होता. लिलीला भीती वाटत होती. पुढे दाट जंगल लागले. ओळंबलेली झाडे लिलीच्या डोक्याला भेटायला येत. लिलीच्या केसांना पाने, लता-वेली लागत.    तिसरा प्रहार होत आला. खांद्यावर बसून लिली कंटाळली असेल असे आजोबांना वाटले. ते जरा थांबले. लिली खाली उतरली. त्यांनी लिलीला खाऊ दिला. इतक्यात पाठीमागून कोणी तरी येत आहे असे त्यांना वाटले. त्यांनी नीट न्याहाळून पाहिले. तो खाणावळवाला येत होता. ती दोघे थांबली. खाणावळवाला जवळ आला.

'का, तुम्ही का पाठोपाठ?'

« PreviousChapter ListNext »