Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »


अघोरी हे हिंदु धर्मातील एक संप्रदाय आहे. त्याच पालन करणाऱ्यांना अघोरी म्हणतात.  अघोर पंथाच्या उत्पत्ती बद्दल अजून कोणताही निष्कर्ष काढला गेला नाही परंतु अशा अघोरी लोकांना कपालिक संप्रदायातील लोकांन प्रमाणे मानतात. हे भारतातील प्राचीन धर्म “शैव”  याच्याशी संबंधित आहेत. अघोऱ्याना पृथ्वी वरील शिवाचे जिवंत स्वरूप मानले जाते. भगवान शिवांच्या पाच रुपांमधून एक अघोर रुपही आहे. अघोरी नेहमीच लोकांसाठी कुतुहलाचे विषय बनले आहेत. अघोऱ्याचे जीवन जितके कठीण तितकेच ते रहस्यमयी आहे. अघोऱ्याची साधना विधि सर्वात जास्त रहस्यमयी असतात. त्यांची स्वतःची जीवनशैली, स्वतःची विधान, स्वतःच्या वेगळ्या विधी असतात. अघोरी ते असतात ज्यांच्या मनात कुणासाठी भेदभाव नसेल. अघोरी प्रत्येक गोष्टीत समान भाव ठेवतात. ते सडलेले मासंही तितक्याच चवीने खातात, ज्या चवीने ते रुचकर जेवण खातात.

Chapter ListNext »