Bookstruck

श्री सोमेश्वर महादेव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


एका प्राचीन कथेनुसार दक्ष प्रजापतीच्या शापाच्या प्रभावामुळे चंद्र लुप्त झाला होता. त्यामुळे पृथ्वीवर औषधी वनस्पती नष्ट होऊ लागल्या. यावर देवानी ब्रम्हदेवाकडे प्रार्थना केली. ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून समुद्र मंथन करण्यात आले ज्यातून एक चंद्र प्रकट झाला.


ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून चंद्र पृथ्वीच्या प्रजेचे पालन करू लागला. शाप ग्रस्त चंद्राने भगवान विष्णूंच्या आज्ञेवरून महाकाल वनात विराजमान शिवलिंगाची पूजा केली आणि भगवान शंकरांकडून वरदान प्राप्त केले आणि पुन्हा आपले शरीर आणि तेज मिळवले. चंद्राने पूजा केली म्हणून या शिवलिंगाचे वान सोमेश्वर महादेव असे पडले. असे मानले जाते की इथे पूजा केल्यामुळे मनुष्याचे सारे कलंक धुतले जातात आणि अंती तो मोक्षपादला जातो.

« PreviousChapter ListNext »