Bookstruck

महान विचारवंत गीआर्दनो ब्रुनो

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

आजपासून ५०० वर्षांपूर्वी, साधारण इ. स. १६०० मध्ये एक महान विचारवंत, गणितज्ञ आणि खगोल शास्त्रज्ञाने हा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर तर त्याला मिळाले नाहीच, उलट त्याला रोम च्या रस्त्यावर जिवंत जाळण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याला जिवंत जाळण्यापूर्वी त्याला अपमानित करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला एका खांबावर नग्न करून उलटे लटकावून ठेवण्यात आले होते. कोपरनिकस प्रमाणे तो देखील असे मनात होता की पृथ्वी सुर्याभोपती प्रदक्षिणा घालते. तो असे देखील मनात असे की बाह्य अंतराळात आपल्या सारखे अगणित जीव राहतात. अंतराळात अगणित संत, करोडो पोप, अब्जावधी चर्च आणि जिझस च्या शक्यतांना संपवून टाकण्यासाठी चर्च कडे एकाच पर्याय होता, त्या विचारवंताला जिवंत जाळून टाकणे.


तो महान विचारवंत गीआर्दनो ब्रुनो याला दिलेली ही अमानुष वागणूक अनेक वर्षे विज्ञानाच्या इतिहासकारांची झोप उडवत आहे. परंतु आज ब्रुनो आपला बदला दर काही आठवड्यांनी घेत आहे. महिन्यातून कमीत कमी २ वेळा कोणत्यातरी ताऱ्याची प्रदक्षिणा करणाऱ्या एका नव्या ग्रहाचा शोध लागत आहे. अंतरिक्षात २५० पेक्षा जास्त कोणा अन्य ताऱ्यांची प्रदक्षिणा करणारे ग्रह सापडले आहेत. अंतराळात सौरमालेच्या बाहेर ग्रह असल्याची ब्रुनो ची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

Chapter ListNext »