Bookstruck

पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शास्त्रीय शोध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंतराळातील जीवनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनुसार अंतराळातील जीवनाबद्दल काहीही निश्चीतपणे सांगणे कठीण आहे. आपण केवळ ज्ञात भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जैविक विज्ञानाच्या नियमांनुसार काही तर्क करू शकतो एवढेच.
अंतराळातील जीवनाचा शोध घेण्यापूर्वी ही गोष्ट निश्चित करणे गरजेचे  आहे की कोणत्याही ग्रहावर जीवन नांदण्यासाठी मुलभूत आवश्यकता कोणत्या आहेत? पृथ्वीवरील जीवन आणि जीवनाचा विकास यांचा अभ्यास आणि ज्ञात भौतिक आणि रसायन शास्त्र आणि जैविक विज्ञानाच्या नियमांनुसार अंतराळात जीवनासाठी आवश्यक असलेल्या घटकांमध्ये प्रमुख घटक आहेत -
    द्रव स्वरूपातील पाणी
    कार्बन, आणि
    DNA सारखे स्वतःची प्रतिकृती तयार करू शकणारे अणू

« PreviousChapter ListNext »