Bookstruck

वोयेजर गोल्डन रेकॉर्ड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


वोयेजर गोल्डन रेकॉर्ड दोन्ही वोयेजर  अंतराळ यानांवर ठेवण्यात आलेल्या फोनोग्राम ची रेकॉर्ड्स आहेत. या रेकॉर्ड वर पृथ्वीवरील विविध प्राण्यांचे आवाज आणि चित्र आहेत. हे रेकॉर्ड परग्रही प्राण्यांसाठी आहे जे भविष्यात कधी या यानांना बघू शकतील. हे दोन्ही वोयेजर यान विस्तृत अंतराळाच्या तुलनेत खूपच छोटी आहेत, एखाद्या बुद्धिमान संस्कृतीद्वारे ही याने शोधली जाण्याची शक्यता अतिशय कमी आहे, कारण ही दोन्ही याने काही वर्षांनंतर कोणत्याही विद्युत चुंबकीय संकेतांचे उत्सर्जन बंद करतील. जा एखाद्या परग्रही संस्कृतीने यांना शोधून काढलेच, तर तेव्हा कमीत कमी ४०००० वर्ष उलटून गेलेली असतील जेव्हा वोयेजर १ हे यान एखाद्या ताऱ्याजवळून जाईल.



वायेजर गोल्डन रेकॉर्ड वर स. रा. अमेरिका च्या राष्ट्रपति चा संदेश आहे
हा एक लघु, दूरस्थ विश्वाचा उपहार आहे ज्यामध्ये आमचे ध्वनी, आमचे विज्ञान, आमचे चित्र, आमचे संगीत, आमचे विचार आणि आमच्या भावना संमिलीत आहेत. आम्ही आमच्या काळापासून सुरक्षित राहून आपल्या (तुमच्या) काळात जगण्याचा प्रयत्न करत आहोत.
या वायेजर गोल्डन रेकॉर्ड मध्ये पहिल्या ध्वनी संदेशात हिंदी, उर्दू सहित ५५ भाषांमध्ये परग्रही लोकांसाठी अभिनंदन संदेश आहे. दुसऱ्या ध्वनी संदेशात पृथ्वीवरील विविध ध्वनींचा समावेश आहे ज्यातील प्रमुख ध्वनी आहेत - ज्वालामुखी, भूकंप, विजेचा आवाज, वायू, पावसाचा आवाज, पक्षी, हत्तीचा आवाज, व्हेल चे संगीत, मातेकडून बाळाचे चुंबनाचा आवाज, हृदयाची धडधड.
पुढील संदेशात विविध संस्कृतींच्या संगीताचा समावेश आहे ज्यामध्ये प्रमुख आहेत - सुश्री केसरबाई केरकर यांचे राग भैरवी मध्ये "जात कहा हो" गायन; मोजार्ट चे संगीत. या वोयेजार गोल्डन रेकॉर्ड च्या पुढच्या भागात कार्ल सागन याची पत्नी एन्न ड्रुयन हिच्या मेंदूतील तरंगांचे रेकॉर्डिंग आहे. त्याच्या पुढील भागात ११६ चित्रांचा समावेश आहे ज्यामध्ये प्रमुख आहेत : सौर मालेचे मानचित्र, प्रीथ्वीचे चित्र, सूर्याचे चित्र, गणिती आणि भौतिक परिभाषा, मानवी शरीराची चित्र.

« PreviousChapter ListNext »