Bookstruck

केप्लर अंतराळ वेधशाला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



२००९ मध्ये नासा ने केप्लर अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केली होती. हा अंतराळात पृथ्वी सारख्या शेकडो ग्रहांना शोधण्यात सक्षम आहे. तो १००००० ताऱ्यांच्या प्रकाशाचे ग्रहांची ताऱ्यांच्या समोर होणाऱ्या अल्चालींच्या प्रभावासाठी मापन करेल. आपल्या ४ वर्षांच्या कार्यकाळात केप्लर १९५० प्रकाशवर्ष अंतरापर्यंत हजारो ताऱ्यांचे निरीक्षण करेल. आपल्या कक्षेत आपल्या प्रथम वर्षात शास्त्रज्ञ या उपग्रहाकडून खालील शोधांची अपेक्षा करतात -
    पृथ्वीच्या आकाराचे ५० ग्रह
    पृथ्वीपेक्षा ३० टक्के मोठे १८५ ग्रह, आणि
    पृथ्वीपेक्षा २.२ पट मोठे ६४० ग्रह



पृथ्वी सारखा पहिला ग्रह शोधण्याचे श्रेय केप्लर अंतराळ वेधशाळेने आपल्या माथी मिळवले जेव्हा २०१० च्या शेवटी त्याने १० ताऱ्यांची परिक्रमा करणाऱ्या केप्लर १० बी या दगडी ग्रहाचा शोध लावला. केप्लर १० बी ग्रह पृथ्वीच्या आकारापेक्षा १.४ पट मोठा आहे, जो आतापर्यंत शोधण्यात आलेला सर्वांत छोटा ग्रह (सौर मालेच्या बाहेरील) आहे. केप्लर १० बी चे द्रव्यामान पृथ्वीच्या द्रव्यमाना पेक्षा खूप जास्त, ४.६ पट आहे. तो आपल्या तार्यापासून  खूप जवळच्या अंतरावरून परिक्रमा करतो.  ताऱ्याच्या पृष्ठभागापासून ३० लाख किमी अंतरावरून, आणि तो या परिक्रमेला पृथ्वी पेक्षा कमी कालावधी घेतो. ताऱ्याच्या इतक्या जवळ असल्या कारणाने या ग्रहाचे तापमान हजारो डिग्री असले पाहिजे. त्याच्यावर जीवन असण्याची शक्यता नगण्य आहे, परंतु हा आतापर्यंतचा सर्वांत कमी द्रव्यामान असलेला, आणि सूर्या सारख्या ताऱ्याची परिक्रमा करणारा ग्रह आहे. हा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण शोध आहे. हा शोध केप्लर अंतराळ वेधशाळेची क्षमता दर्शवतो.

« PreviousChapter ListNext »