Bookstruck

हॉलीवूड ची कल्पना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु तरीही हॉलीवूड त्यावेळी बरोबर असते जेव्हा ते परग्रही जीवांना मांसाहारी दाखवतात. मांसाहारी परग्रही चित्रपटाला यशस्वी व्यवसाय करून देतातच, परंतु त्यात एक सत्य देखील लपलेले आहे. शिकारी हे सामान्यतः सावजापेक्षा जास्त बुद्धिमान असतात. शिकाऱ्याला शिकार करण्यासाठी योजना बनवणे, पाठलाग करणे, लपणे आणि शिकारीशी लढावे लागते. कोल्हा, कुत्रा, वाघ आणि सिंह शिकारीवर झडप घालण्यापूर्वी त्यांच्यापासुंचे आपले अंतर समजून घेण्यासाठी आपले डोळे समोरच्या बाजूला ठेवतात.


त्यांना आपल्या शिकारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोन डोळ्यांसहित त्रिमिती दृष्टी प्राप्त असते.तर हरण, ससा यांच्यासारख्या सावजाना केवळ पळून जाता येते, त्यांचे डोळे चेहेऱ्याच्या बाजूला अशा प्रकारे असतात की त्यांना ते आपल्या आसपास ३६० अंशात शिकार्याला पाहू शकतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर अंतराळातील जीव हे वरील शिकार्यांसारखे दिसणारे असू शकतील. ते कोळ, सिंह आणि मानव यांची आक्रमक, मांसाहारी आणि स्थानिक लक्षणे आपल्याजवळ बाळगून असू शकतील. परंतु अशी देखील शक्यता आहे की त्याचेह जीवन हे वेगळ्या प्रकारच्या DNA किंवा प्रोटीन अणू यांच्यावर आधारलेले असल्याने त्यांना आपल्यासोबत खाणे किंवा रहाणे यात काहीही रुची नसेल.

« PreviousChapter ListNext »