Bookstruck

परग्रही संस्कृतींचे पृथ्वीवर आक्रमण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


हॉलीवुड चित्रपटात अन्य परग्रही संस्कृतींचे पृथ्वीवर आक्रमण दाखवणे ही समय पटकथा आहे. परंतु ही केवळ बॉक्स ऑफिस वर पैसे कमवण्या पुरतेच सत्य आहे. हॉलीवुड चित्रपट " इंडीपेन्डेन्स डे“ किंवा “बैटल: लास एन्जीलस” यांच्या विरुद्ध वर्ग ३ च्या संस्कृतींना पृथ्वीवर आक्रमण आणि विजय प्राप्त करण्यात कोणतीही रुची नसेल. “इंडीपेन्डेन्स डे“ ची परग्रही संस्कृती टिड्डि प्रमाणे ग्रहांवर आक्रमण करून त्यांच्या साधनांचा वापर करून पुढे जात राहतात. प्रत्यक्षात अंतराळात असे अनेक मृत ग्रह आहेत ज्यांच्यावर खनिज संपत्तीची उपलब्धी आहे, या संपत्तीचा प्रयोग स्थानिक संस्कृतीच्या विरोध शिवाय देखील केला जाऊ शकतो. (अशाच काहीशा प्रकारे जेम्स कैमेरॉन च्या ’अवतार’ मध्ये आक्रमण करणारी मानव प्रजाती पेंडोरा वर “अनाब्टेनियम“ साठी आक्रमण करते.) ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की वर्ग 0 मधील संस्कृतीच भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी आक्रमण करतात. उच्च वर्गातील संस्कृती या एवढ्या प्रगत असतात की ते कोणत्याही आक्रमण किंवा हिंसेशिवाय अहिंसक स्वरुपात या सर्व वस्तू मिळवू शकतात. वर्ग ३ च्या संस्कृतीची आपल्याशी वर्तणूक ही साधारण आपली मुंग्यांशी जशी वर्तणूक असते तशीच असेल. आपण खाली वाकून मुंग्यांना मोती किंवा दागिने देत नाही, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, त्यांची उपेक्षा करून पुढे निघून जातो. मुंग्यांना आपल्यापासून अक्तामानाची भीती नसते, त्या जेव्हा आपल्या मार्गात आडव्या येतात तेव्हाच फक्त आपण त्यांना तेथून दूर लोटून देतो. वर्ग ३ आणि वर्ग 0 या संस्कृती मधली दरी ही आपण आणि मुंग्या यांच्यातील दरी पेक्षा खूप मोठी आणि खोल आहे.

« PreviousChapter ListNext »