Bookstruck

स्टीफन हांकिन्ग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List



मजेदार गोष्ट अशी की स्टीफन हांकिन्ग ने काळाच्या यात्रेच्या संकल्पनेला विरोध केला होता. त्यांनी असेही सांगितले होते की त्यांच्याकडे याचे अनुभव सहित प्रमाण आहे. त्यांच्या मते जर काळाची यात्रा शक्य असेल तर मग भविष्यातून आपल्या काळात आलेले काळ यात्री कुठे आहेत? आणि ते नाहीत याचाच अर्थ समय यात्रा अशक्य आहे. परंतु मागील काही वर्षांत सैद्धांतिक भौतिकात अनेक नवे शोध लागलेले आहेत, ज्यामुळे पप्रभावित होऊन स्टीफन हांकिन्ग यांनी आपले मत बदलले आहे. आता त्यांच्या मते समय यात्रा शक्य आहे परंतु व्यवहार्य नाही.



आपल्याकडे भविष्यातील प्रवासी एकाच कारणाने येत नसावेत की आपण तेवढे महत्त्वाचे नाहीयोत. काळाची यात्रा करू शकणारी संस्कृती ही खूपच विकसित असेल आणि एखाद्या ताऱ्याची संपूर्ण उर्जा वापरण्याची पद्धत तिला अवगत असेल. जी कोणती संस्कृती ताऱ्याच्या उर्जेवर नियंत्रण ठेवू शकत असेल, त्यांच्यासाठी आपण केवळ एक मागास संस्कृती असू, दुसरे काही नाही. तुम्ही थोडीच मुंग्यांना आपले ज्ञान, औषध किंवा उर्जा देताय? काही जन तर त्यांना पायाखाली चिरडून टाकतात.

त्यामुळे उद्या जर कोणी तुमच्या दारावर आला आणि म्हणाला की तो भविष्यातून आलेला आहे आणि तुमच्या नातवाच्या नातवाचा नातू आहे, तर दार बंद करू नका. कारण शक्यता आहे की तो खरे बोलत असेल.

« PreviousChapter List