Bookstruck

सोनीचे लग्न 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दोघे त्या पवित्र, प्रशान्त स्थानी जाऊन बसली. स्तब्धता होती. मंद वारा वाहात होता. झाडे माना डोलवीत होती. तिकडे आकाशात अनंत रंग पसरलं होते.

“रामू, तू आज असा का?”

“मग कसा असू?”

“आनंदी अस, तू हस व मला हसव.”

“सोने, ही बाग आपण फुलवली.”

“किती छान दिसते नाही?”

“परंतु रामूच्या जीवनाची बाग कधी फुलणार? किती दिवस वाट बघायची?”

“रामू!”

“काय?”

“सांगू? तुझं माझं लग्न ठरलं! आज तुझी आई व माझे बाबा यांनी निश्चित केलं. सकाळी माझा साखरपुडा झाला. ही बघ तुलाही साखर आणली आहे. तुला देण्यासाठी घरी गेल्ये होत्ये. परंतु तू इकडे आलास. ही घे साखर व तोंड गोड कर. आता लवकरच बागा फुलतील. रुसू नको. रागावू नको. घे ना.”

“माझ्या तोंडात घाल.”

“बरं.”

सोनीने रामूच्या तोंडात साखर घातली. दोघांना अपार आनंद होत होता. सोनीचा हात त्याच्या हातात होता. कोणी बोलेना.

“रामू, आपण आईची पूजा करू.”

ये करू.”

« PreviousChapter ListNext »