Bookstruck

डॉ. होमी भाभा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
डॉ. भाभा यानी दाखवून दिलेल्या रस्त्यावरील पुढील पायरी म्हणजे breeder reactors. हे असे रिअॅक्टर्स असतात कीं त्यांत जळणार्या अणुइंधना इतके (जवळपास) नवीन अणुइंधन त्यांत तयार होते! त्याचे काही प्रकार आहेत पण त्यातील शास्त्र किचकट आहे त्यामुळे त्यात जास्त शिरण्यात अर्थ नाही. भारताला त्यांचे महत्व कां हे पाहूं. भारतांत युरेनिअम तसे थोडेच आहे पण थोरिअम चिकार आहे. थोरिअम स्वत:हून विस्फोट होणारे नाही. U232 हे त्याचे वर्णन आहे. मात्र हे रिअॅक्टरमध्ये ठेवले तर त्याचेवर सुटे न्यूट्रॉन आदळून त्याचे रूपांतर U233 या Isotope मध्ये होते व हा U235 प्रमाणे विस्फोट होणारा धातु आहे. त्याचा वापर करून आणखी पॉवर/रिसर्च रिअॅक्टर्स बांधतां येतील. भारताने कल्पक्कम येथे प्रथम एक छोटा breeder reactor बांधला आहे व अनेक अडचणींनंतर तो १० वर्षांपूर्वी व्यवस्थित चालू झाला आहे. तसाच आणखी मोठा breeder reactor हि बांधला जातो आहे.  या रिअॅक्टर्समध्ये ठेवलेल्या थोरिअमपासून मिळालेल्या U233 (थोरिअमचा प्रकार) चा वापर करून एक छोटा प्रायोगिक रिअॅक्टरहि सुरू झाला आहे. त्याचे नाव कामिनी असे आहे. यातून प्रगति करून थोरिअम U233 वापरणारा भारतीय बनावटीचा power reactor जेव्हां प्रत्यक्षात येईल तेव्हां डॉ. भाभांचे स्वप्न खरे होईल.  तो दिवस फार दूर नसावा असे वाटते.
« PreviousChapter ListNext »