Bookstruck

घरी परत 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'त्याला काहीतरी बडबडायची सवयच आहे.' विजयने सांगितले.

एके ठिकाणी तिघांनी वाटेत स्वयंपाक केला. विजयने पाने आणून पत्रावळी लावल्या. त्या मुलीने भाकर्‍या भाजल्या. पिठले केले. आनंद! वनात असे झर्‍याकाठी खाण्यात किती मजा वाटते!

आता त्यांचे रस्ते अलग फुटणार होते. त्या तिघांची ताटातूट होणार होती.

'तुमचे नाव काय? तिने विचारले.

'विजय.' तो म्हणाला.

'खरेच तुम्ही विजयी व्हाल. जीवनात सर्वत्र विजयी व्हाल.' ती म्हणाली.

'आणि तुमचे नाव काय?' त्याने विचारले.

'माझे नाव मुक्ता.' ती म्हणाली.

'किती सुंदर नाव!' तो म्हणाला.

'तुमचे काय वाईट आहे?' तिने हसून विचारले.

'दोघांची छान आहेत.' तो वृध्द म्हणाला.

तिघे आता मुकाटयाने जात होती आणि तो निराळा रस्ता आला. तो वृध्द व त्याची ती मुलगी वळली. विजय तेथेच उभा होता.

'प्रणाम, विजय,' मुक्ता म्हणाली.


« PreviousChapter ListNext »