Bookstruck

तुरुंगात 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुम्ही बाहेरच बसा.'

'का बरे?'

'काय काय करणार आहे ते तुम्हाला आधी कळू नये म्हणून. आधी कळले म्हणजे सारी मजा जाते. जा बाहेर.'

मुक्ताचा स्वयंपाक झाला. ती विजयला मनापासून वाढीत होती. त्यालाही भूक लागली होती.
'विजय पोटभर जेवा.' मुक्ता म्हणाली.

'पोट भरणारच नाही कधी.' तो म्हणाला.

'तुम्ही का राक्षस आहात?' तिने हसून विचारले.

'तुम्हाला वाटते का तसे?' त्याने प्रश्न केला.

'विजय, तुम्ही देवमाणूस आहात -' ती म्हणाली.

'मी साधा माणूस आहे. साधा माणूस म्हणूनच मला जगू दे. बाबा मला देव करू पाहात आहेत.' तो म्हणाला.

'म्हणजे काय?' पित्याने विचारले.

'मला म्हणतात, तू यती हो. भिक्षू हो. धर्माला वाहून घे.' विजयने उत्तर दिले.

'तुम्हाला नाही का ते पसंत?' पित्याने विचारले.

'नाही. माझी ती वृत्ती नाही. संसारातच धर्म आणावा असे मला वाटते. विरक्तीची वृत्ती ओढूनताणून थोडीच आणता येते?' विजय म्हणाला.


« PreviousChapter ListNext »