Bookstruck

चित्रेचे लग्न 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

होय.’

‘माझे नाव माहीत आहे का तुम्हाला?’

'माझ्या घरी थोडेच कोणी लग्नाचे बोलतो? कसे कळणार तुमचे नाव?’

‘तुमची आई तुमच्या लग्नाची खटपट करीत नाही का? मला माहीत आहे.’

‘परंतु तुमचे नाव काय?

‘सांगूच?’

‘सांगा.’

‘हस्त नक्षत्राच्या पुढे कोणते नक्षत्र येते?’

‘माझी परीक्षा घेता वाटते?’

‘हो.’

‘उत्तरा ना?’

‘अहो हस्त नक्षत्राच्या पाठीमागचे नाही! हिन्दुस्थानला पाठीमागे नाही जायचे, पुढे जायचे आहे!’

‘उत्तरा, हस्त, चित्रा...’

‘हं.’

‘तुमचे नाव चित्रा?’

‘होय.’

‘छान आहे नाव. रविंद्रनाथांच्या एका काव्यमय नाटकाचे चित्रा आहे.’

‘तुम्ही आता जा तिकडे. माझा गुच्छ नाही तर तसाच राहील.’

चारु निघून गेला. चित्राने त्याचाकडे पाहिले. तिने सुंदर गुच्छ तयार केला आणि ती बंगलीत परत आली.

‘चित्रा, कोठे होतीस हिंडत?’ बळवंतरावांनी विचारले.

‘होत्ये फुलांच्या संगतीत.’ ती म्हणाली.

‘गालाची फुले झाली आहेत. उन्हात इतक्या वेळ का राहायचे?’

‘बाबा, लागू दे की एखादे वेळेस थोडे ऊन!’

‘तुला भूक लागली आहे का? ही बघ फळे आहेत. आम्ही खाल्ली. तुला ठेवली आहेत.’

‘मी का आता एकटीच खाऊ?’

« PreviousChapter ListNext »