Bookstruck

आत्म्याचा प्रवास

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


आत्मा शरीरात राहून ४ पायऱ्यामधून प्रवास करतो - छांदोग्य उपनिषद (८-७) च्या अनुसार आत्मा ४ स्तरांवर स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो - १.जागृत, २.स्वप्न, ३.गाढ निद्रा आणि ४.तुरीय अवस्था.
यापैकी तीन अवस्था प्रत्येक जन्म घेतलेला माणूस अनुभवू शकतो, परंतु चौथ्या स्तराचा अनुभव फक्त त्यांनाच घेता येतो जे आत्मवान झालेत किंवा ज्यांना मोक्ष प्राप्त झाला आहे. तो शुद्ध तुरीय अवस्थेत असतो जिथे ना जागृती आहे, ना स्वप्न आणि ना गाढ झोप, असे मनुष्य केवळ द्रष्टा असतात. या अवस्थेला पूर्ण जागरण अवस्था देखील म्हटले जाते.

« PreviousChapter ListNext »