Bookstruck

आपल्या चुकांचे आभारी बना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


आपल्या चुकांचे आभारी बनणे तुम्हाला अगदी विचित्र वाटेल. विशेषकरून त्या चुका ज्यामुळे तुम्हाला खूपच लाज वाटली असेल किंवा दुःख झाले असे. परंतु बारकाईने या गोष्टीकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की अशा चुकांनीच तुम्हाला किती मजबूत आणि सुदृढ केले आहे. तुमच्या असे लक्षात येईल की या चुकांमुळेच तुम्ही अधिक बुद्धिमान, मजबूत आणि विचारशील होऊ शकले आहात.

या चुकांमुळेच मी आता कोणत्याही गोष्टीवर घाईने निर्णय घेण्यापासून बचावतो आणि जेव्हा कधी मी अस्वस्थ असतो तेव्हा वेळ काढून विचारकरून मगच पुढच्या गोष्टी ठरवतो.

तुमचा अनुभव जर दुसऱ्या कोणाच्या अडचणी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार असेल तर स्वतःला क्षमा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची मदत झाली आहे आम्हाला नक्की सांगा,, जेणे करून जास्तीत जास्त लोक ते वाचू शकतील.
« PreviousChapter List