Bookstruck

कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 श्लोक तथा विषय

या पुराणात महर्षी कश्यप आणि तक्षक नागाशी संबंधित एक सुंदर आख्यान देण्यात आले आहे. ऋषींच्या शापामुळे जेव्हा तक्षक नाग राजा परीक्षित याला दंश करण्यासाठी जात होता, तेव्हा वाटेत त्याची भेट कश्यप ऋषींशी झाली. तक्षकाने ब्राम्हणाचा वेश घेऊन त्यांना विचारले की - " तुम्ही एवढे उतावीळ होऊन कुठे जात आहात?" यावर काश्याय्प म्हणाले की - "तक्षक नाग परिक्षिताला दंश करणार आहे. मी त्याचा विष प्रभाव दूर करून त्याला पुन्हा जीवन देणार आहे."
हे ऐकून तक्षकाने स्वतःचा परिचय करून दिला आणि त्यांना परत जाण्यास सांगितले. कारण त्याच्या विष प्रभावापासून आजपर्यंत एकही व्यक्ती जिवंत बचावली नव्हती. तेव्हा कश्यप ऋषी म्हणाले की - "मी माझ्या मंत्र शक्तीने परिक्षिताचा विष प्रभाव दूर करीन." यावर तक्षक म्हणाला की - "जर असे असेल तर तुम्ही या वृक्षाला पुन्हा जिवंत करून दाखवा. मी त्याला दंश करून आत्ताच भस्म करून टाकतो." तक्षक नागाने जवळच असलेल्या एका वृक्षाला आपल्या विषाच्या प्रभावाने तत्काळ भस्म करून टाकले.
यावर कश्यप ऋषींनी त्या वृक्षाचे भस्म एकत्र केले आणि त्यावर आपले मंत्र फुंकले. तेव्हा तक्षकाने आश्चर्याने पाहिले की त्या भास्मातून अंकुर फुटला आणि पाहता पाहता वृक्ष पुन्हा जिवंत झाला. हैराण ताक्षकाक्ने ऋषींना विचारले की - "तुम्ही राजाचे भले कोणत्या कारणासाठी करणार आहात?" ऋषींनी उत्तर दिले की त्यांना तिथून धनाची प्राप्ती होईल. यावर तक्षकाने त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त धन देऊन परत पाठवले. गरुड पुराणात म्हटलेले आहे की कश्यप ऋषींचा हा प्रभाव गरुड पुराण ऐकल्यामुळेच होता.
« PreviousChapter ListNext »