Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

३५

बापूंच्या करुण मरणाआधीची एक गोष्ट. मीराबेन दिल्लीला आल्या होत्या.

‘बापू, तुम्ही हृषीकेशला या ना एकदा! माझ्यासाठी नव्हे, परंतु तुमच्या आवडत्या गायींसाठी. कशा सुंदर गायी आहेत.

‘मी आता मृतवत् आहे. कशाला बोलावतेस?’ असे बापू बोलले. ‘देशभर जातीय रक्तपात. मी सांगत आहे, परंतु माझं कोण ऐकतो?’ मी एकटा आहे, असे बापूंना वाटे. या कत्तली बघण्यापेक्षा मरण बरे, असे का त्यांना वाटे? परंतु मीराबेनची करुण, दु:खी मुद्रा पाहून गंभीरपणे म्हणाले,

‘मी मेल्यावर तुम्हा सर्वांशी अधिकच एकरूप होईन, देहाचा बंध गळेल, आत्मा मुक्त होईल. सर्वांशी मिळून जाईन. खरं ना?’

« PreviousChapter ListNext »