Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 50

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

५२

महात्माजी स्वातंत्र्याचे भोक्ते. लादालादीचा धर्म त्यांना आवडत नसे. ते नेहमी म्हणायचे की, मी लोकशाहीचा सर्वांत मोठा उपासक आहे. खरे प्रेम स्वातंत्र्य देणारे असते. खरे प्रेम कधी गुलाम करीत नसते. परमेश्वराचे प्रेम असे निरपेक्ष असते. तुम्ही चांगले वागाल, या आशेने तो सूर्य, तारे, मेघ, फुले- सारे देतच असतो. महापुरुष असेच असतात.

अस्पृश्यता निवारणाचा १९३३-३४ मधील महात्माजींचा दौरा मध्य प्रांतापासून सुरू झाला. थोर देशभक्त बॅ. अभ्यंकर महात्माजींबरोबर त्यांच्याच मोटारीत मध्यप्रांतभर होते. बॅ. अभ्यंकर स्पष्टवक्ते. त्यांची भक्ती निर्भयच असे. खरे प्रेम निर्भयच असते. जेथे भय आहे, संकोच आहे, तेथे प्रेम कोठले? बॅ. अभ्यंकर गांधीजींना मोटारीतून जाताना म्हणाले, ‘तुमच्याबरोबर प्रवास करणं मोठं कठीण, जिकरीचं.’

‘का, काय झालं?’ गांधीजींनी हसून विचारले.

‘तुमच्याबरोबर मला सिगारेट ओढता येत नाही! तुमच्यादेखत कशी ओढायची? कुचंबणा होते.’ अभ्यंकर म्हणाले.

‘तुम्ही ओढू शकता. खरंच ओढा.’ गांधीजी मोकळेपणाने म्हणाले.

गांधीजींनी परवानगी दिली. परंतु महात्माजींबरोबर हिंडत असेपर्यंत बॅ. अभ्यंकरांनी एकही सिगारेट ओढली नाही.