Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 83

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

८५

एडनला हा सन्मान समारंभ घडला; परंतु येथील ती दुसरी गोष्ट. येथूनच महात्माजींनी बरोबरचे काही सामान हिंदुस्थानला परत पाठवले. मुंबईहून बोट सुटल्यावर गांधीजी सामान पाहू लागले. किती तरी सामान!

‘महादेव, या पेट्यांतून काय आहे? इतकं सामान कसं जमलं?’ बापूंनी विचारले.

‘विलायतेत थंडी फार, म्हणून अनेकांनी कपडे दिले आहेत. रग आहेत, गरम कपडे आहेत. नाही कसं म्हणायचं? ही एक काश्मिरी शाल आहे.’ महादेवभाई अजीजीने सांगत होते.

‘इतके कपडे घेऊन आपण कसं जायचे? दरिद्रीनारायणाचे प्रतिनिधी म्हणून ना आपण जात आहोत? ही वस्त्रं, प्रावरणं पाहून आपणास गरीब कोण म्हणेल? मला तर कपडे लागणार नाहीत. फारच थंडी पडली तर धाबळी पुरे. तुम्हांला अगदी जरूर तेवढेच ठेवा. बाकीचे सारे परत करा. आता एडन येईल.’

आणि महादेवभाईंनी एडनली तो सारा संभार उतरवला. हिंदला परत पाठवा, तेथील मित्रांना सांगितले. कमरेला पंचा नेसून दरिद्रीनारायणाचा प्रतिनिधी ज्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे. त्याच्या राजधानीला गेला.

« PreviousChapter ListNext »