Bookstruck

'भृगु संहिता' मधील संदर्भ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
'भृगु संहिता' मध्ये चारही वर्णांच्या उत्पत्तीचा उल्लेख अशा प्रकारे आहे की सर्वप्रथम ब्राम्हण वर्ण होता, त्यानंतर कार्मांनुसार ब्राम्हणाच क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णाचे बनले तसेच या वर्णांचे रंग देखील क्रमशः श्वेत, रक्तिम, पीत आणि कृष्ण होते. नंतरचे तीनही वर्ण ब्राम्हण वर्नापासूनच विकसित झाले. हा विकास अति रोचक आहे. जे ब्राम्हण कठोर, शक्तिशाली, क्रोधी स्वभावाचे होते, ते राजोगुनांच्या प्रभावाने क्षत्रिय बनले. ज्यांच्यामध्ये तमोगुण अधिक झाले ते शूद्र बनले. ज्यांच्यामध्ये पीत म्हणजेच तामोमिश्रीत रजोगुण होते ते वैश्य बनले आणि जे आपल्या धर्मावर दृढ राहिले आणि ज्यांच्यात सातोगुण कायम राहिले ते ब्राम्हणच राहिले. अशा प्रकारे ब्राम्हनापासून गुण आणि कार्मांनुसार चार वर्णांचा विकास झाला.
« PreviousChapter ListNext »